मेष
कर्तृत्व व मेहनतीचे चांगले फळ निश्चितपणाने मिळेल, चांगली आर्थिक प्रगती होईल. कष्ट करीत राहा.
वृषभ
सध्याच्या परिस्थितीत जोखमीची आर्थिक गुंतवणूक नको, संतुलित आणि चांगला आहार घ्यावा.
मिथुन
आपल्या मनात ज्याची इच्छा होती तशाच अगदी मनासारख्या घटना घडतील, प्रसन्नता लाभेल.
कर्क
थोडीशी अस्वस्थता राहील, मन अशांत राहील. घालमेल होत राहील. नियमांचे उल्लंघन नको, संयम ठेवणं गरजेचं आहे
सिंह
आप्तेष्टांच्या संवादाने मन प्रसन्न राहील. जुने सहकारी भेटतील. लाभदायक दिवस आहे.
कन्या
अतिशय समजूतदारपणाने वागाल, सर्वांना आपल्या स्नेहाच्या धाग्याने जोडाल. कौटुंबिक सौख्य आणि कुटुंबातील वातावरण उत्तम राहील.
तूळ
मोहाचे क्षण येतील, सद्सद्विवेक बुद्धीने निर्णय घ्यावा, संभ्रमित अवस्था राहील.
वृश्चिक
विनाकारण मनःस्ताप होईल, नकोशा घटना घडतील, गैरसमजातून वाद होतील, आत्मचिंतनाची गरज आहे, असे लक्षात येईल.
धनु
घरात आनंददायी घटना घडतील, व्यावसायिक स्पर्धेमधे मोठे यश मिळेल, मन प्रसन्न राहील.
मकर
जवळच्या लोकांचे सहकार्य लाभेल, नियोजित केलेल्या कामासंदर्भात ध्येयपूर्ती होईल.
कुंभ
अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागेल, मानसिक समतोल बिघडेल, शांत राहावे.
मीन
घरगुती कामांमध्ये दिवस निघून जाईल, विनाकारण कौटुंबिक कलह टाळावा.